Video : हिंगोलीचे मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेसाठी रवाना
आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यापैकी एक मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती. तर दुसरी ठाण्यात सभा झाली. या दोनही सभेत राज ठाकरे यांनी […]
आज औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या आहेत. त्यापैकी एक मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती. तर दुसरी ठाण्यात सभा झाली. या दोनही सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंग हटवण्यासाठी सरकारला तीन मे रोजीचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. तीन मेला आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. यासाठी ठिकठिकाणाहून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. हिंगोलीचे मनसे कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
Latest Videos