Raj Thackeray Aurangabad Sabha Live | अन् राज ठाकरेंनी शिवरायांचा इतिहासच वाचला

| Updated on: May 01, 2022 | 10:29 PM

शिवाजी व्यक्ती नाही तो विचार आहे. हा विचार भूमीत पसरला तर आपलं काही खरं नाही. तेच झालं. मराठी शाहीने मोगल साम्राज्य उद्धवस्त केलं. पाकिस्तानातील अटोक किल्ला तिथे भगवी पताका फडकली. हा मराठी शाहीचा इतिहास आपण विसरलो. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतो महापुरुषांच्या.

औरंगाबाद : 1630 ला दार उघडलं. छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले. इथे आमच्या नांदेडला राहणारे नरहर कुरुंदकर यांच्या पुस्तकात चांगलं वर्णन केलं आहे. शिवाजी महाराज म्हणजे कोण होते. आपण फक्त काय विचार करतो. अफजल खानाचा कोथळा काढला. शाहिस्तेखानाची बोटं छाटली. केवळ 50 वर्षाचं आयुष्य. एवढा मोठा राजा. बादशहा औरंगजेब. आग्र्याहून महाराष्ट्र निसटले म्हणून त्यांना मारायला सर्व सोडून आला. ज्याच्यासाठी तो माणूस राहिला नाही. त्याला शोधण्यासाठी औरंगजेब आला. 27 वर्ष तो इथे राहिला आणि इथे मेला. परत आग्र्याला गेला नाही. संभाजी राजे, ताराराणी साहेब, राजाराम महाराज, संताजी धनाजी लढले. 1707 मध्ये मेला तो. औरंगजेबाने जी पत्रं पाठवली त्यात तो कुणाचा उल्लेख करत नाही. तो फक्त महाराजाचं नाव घेतो. शिवाजी अजून मला छळतो. ती प्रेरणा आहे. त्याला तो शिवाजी म्हणतो. तो वेडा नव्हता. त्याला कळलं होतं. शिवाजी व्यक्ती नाही तो विचार आहे. हा विचार भूमीत पसरला तर आपलं काही खरं नाही. तेच झालं. मराठी शाहीने मोगल साम्राज्य उद्धवस्त केलं. पाकिस्तानातील अटोक किल्ला तिथे भगवी पताका फडकली. हा मराठी शाहीचा इतिहास आपण विसरलो. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंती साजरी करतो महापुरुषांच्या.