बम गर्दी! जंगी स्वागत!! राज ठाकरे नागपुरात, दौरा सुरु

बम गर्दी! जंगी स्वागत!! राज ठाकरे नागपुरात, दौरा सुरु

| Updated on: Sep 18, 2022 | 11:47 AM

5 दिवस, 22 सप्टेंबर पर्यंत हा दौरा असणारे. दरम्यान मुंबई ते नागपूर असा प्रवास करून ते नागपुरात दाखल झालेत. रेल्वे स्थानकावर बम गर्दी पाहायला मिळालीये. नागपूरकरांनी, मनसैनिकांनी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलंय! 

नागपूर: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे ने चांगलीच कंबर कसलीये. राज ठाकरेंनी पहिल्यांदाच नागपूर दौरा हाती घेतलाय. आज राज ठाकरे नागपुरातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यांचा हा विदर्भ दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांना, इथल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत. 5 दिवस, 22 सप्टेंबर पर्यंत हा दौरा असणारे. दरम्यान मुंबई ते नागपूर असा प्रवास करून ते नागपुरात दाखल झालेत. रेल्वे स्थानकावर बम गर्दी पाहायला मिळालीये. नागपूरकरांनी, मनसैनिकांनी राज ठाकरेंचं जंगी स्वागत केलंय!

 

Published on: Sep 18, 2022 11:46 AM