राज ठाकरे परळी कोर्टात, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, यासह अन्य सकाळी सातच्या बातम्या

राज ठाकरे परळी कोर्टात, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, यासह अन्य सकाळी सातच्या बातम्या

| Updated on: Jan 18, 2023 | 7:55 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDR MODI ) उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत असून सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या हस्ते मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) आज बीड ( Beed ) येथील परळी ( Parli ) न्यायालयात हजर राहणार आहेत. २००८ साली मनसेने परप्रातीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्या अटकेचे पडसाद परळीमध्ये उमटले होते.

मनसे कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसेसची मोडतोड केली होती. त्यामुळे परळी येथे राज ठाकरे यांच्याविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला होता. कोर्टात सातत्याने गैरहजर राहिल्याने अखेर त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

भाजप खासदार सुजय विखे पाटील ( BJP MO SUJAY VIKHE PATIL ) यांनी काँग्रेसमध्ये लवकरच भूकंप होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. कॉंग्रेसचे मंत्री स्वपक्षाच्या आमदारांची कामे करत नव्हते. म्हणून कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली असून त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्येही लवकरच भूकंप होणार असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDR MODI ) उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत असून सायंकाळी ६.३० वाजता त्यांच्या हस्ते मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते अन्य विविध विकासकामांचे भमिपूजनही होणार आहे. यासह अन्य सकाळी सातच्या बातम्या

Published on: Jan 18, 2023 07:55 AM