Raj Thackeray यांच्या Y+ सुरक्षेत पोलिसांची संख्या वाढवली
राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुंबई पोलीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे आता तरी हा वाद संपेल ही अपेक्षा आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात राज ठाकरेंना धमक्या (Raj Thackeray Threat) आल्या होत्या. तशी तक्रारही मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेत (Mumbai Police) वाढ करण्याची मागणी जोर धरत होती. आता पोलिसांनी या मागणीची दखल घेत त्यांच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे नाव राज्याच्या राजकारणात धुडगूस घालत आहे. गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाची भूमिका उचलून धर मशीदीवरील भोंग्याविरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर अनेक राजकीय आरोपही झाले. काही संघटनांचा राज ठाकरेंना काडकडून विरोधही झाला तर अलिकडेच राज ठाकरे आणि बाळा नांदगावकरांना धमकी आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.