Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Aurangabad Sabha Live | औरंगाबादचं मूळ नाव ठाकरेंनी सांगितलं

| Updated on: May 01, 2022 | 10:13 PM

संभाजीनगरचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या अगोदरची आमची पैठण. मला वाटतं महाराष्ट्र दिन 1 मे साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. मला त्यांची कल्पना आहे. पाण्याचा प्रश्न आहे. सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची मला कल्पना आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत. ते धरून मी बोलणार आहे. संभाजीनगरचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या अगोदरची आमची पैठण. मला वाटतं महाराष्ट्र दिन 1 मे साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रच समजून घेतला नाही. जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालची जमीन सरकली, भूगोल सरकला. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत. महाराष्ट्राचे आहोत.