शिवसेना-मनसे युतीसाठी त्यावेळी 7 कॉल, पण..., राज ठाकरे यांचं 'ते' भाषण व्हायरल

“शिवसेना-मनसे युतीसाठी त्यावेळी 7 कॉल, पण…”, राज ठाकरे यांचं ‘ते’ भाषण व्हायरल

| Updated on: Jul 07, 2023 | 1:41 PM

गुरुवारी राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेच्या वतीने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूकंपानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचे बॅनर्सही अनेक ठिकाणी लागले. अशातच गुरुवारी राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसेच्या वतीने ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राज ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. राज ठाकरे यांनी या भाषणात आपण उद्धव ठाकरे यांना युतीसाठी 7 कॉल्स केले होते पण…, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 07, 2023 01:41 PM