Video : फुलांचा वर्षावात राज ठाकरे यांचं औरंगाबादेत स्वागत

Video : फुलांचा वर्षावात राज ठाकरे यांचं औरंगाबादेत स्वागत

| Updated on: Apr 30, 2022 | 6:12 PM

मशिदींवरील भोंग्यांबाबत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत सभेची घोषणा केली. त्यानुसार 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादेत (Aurangabad) दाखल झाले आहेत. यावेळी क्रांती चौकात राज यांचं जंगी स्वागत […]

मशिदींवरील भोंग्यांबाबत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत सभेची घोषणा केली. त्यानुसार 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादेत (Aurangabad) दाखल झाले आहेत. यावेळी क्रांती चौकात राज यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांचा गजर आणि फुलांच्या वर्षावात राज यांचं स्वागत झालं. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांसह शेकडो मनसैनिक क्रांती चौकात उपस्थित होते. भगवे फेटे घातलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आगमनानंतर जोरदार घोषणाबाजी केली.