'सुधरायचं वय निघुन जातं आणि बिघडायचं...,' काय म्हणाले राज ठाकरे

‘सुधरायचं वय निघुन जातं आणि बिघडायचं…,’ काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Aug 24, 2024 | 1:40 PM

महाराष्ट्रात गेली पाच वर्षे गलिच्छ राजकारण सुरु असून जातीपातीत समाज विभागला असल्याचे राज ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर समाजात जातीत विभागला गेल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

विधानसभा निवडणूकांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. आणि विविध ठिकाणांचा दौरा करीत आहेत, राज ठाकरे यांनी आज नागपूर दौऱ्यात कार्यकर्त्यांनी मने जाणून घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी आपण येत्या विधानसभेला सवा दोनशे ते दोनशे उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले परंतू त्यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारून आपल्या मनातील योजना काही उघड केल्या नाहीत.आजचं राजकारण पाहाता… यावेळी तुम्हाला आता थोडं डिप्मोमॅटिक उत्तरं द्या असा सल्ला दिला जातो का ? यावर राज म्हणाले मला सांगितले जातं जास्त खरं बोलू नका ? असा सल्ला अमित देतो का ? या प्रश्नावर नाही अमित नाही पण दुसरी मंडळीत देत असतात…परंतू एका क्षणाला माणसाचं सुधरायचं वय देखील निघुन जातं आणि बिघडायचं देखील ..त्यानंतर काही बदल होत नाहीत असे उत्तर राज यांनी देताच एक हशा पिकला..

 

Published on: Aug 24, 2024 01:39 PM