Video | मी जरांगे पाटील यांना सांगितले होते, हे…,’ राज ठाकरे काय म्हणाले
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी नाशिक येथील वर्धापन दिनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्राला जातीजातीत लढविले जात आहे. जातीचं विष कालवले जात आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
नाशिक | 9 मार्च 2024 : राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीवर मोठे भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले की त्या दिवशी नाट्यसंमेलनात आपल्याला पाच नगरसेवक आपल्याला भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. आले होते मात्र एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही आतून सर्व एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मी गेलो होतो. मी त्यांना सरळ सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाहीए..टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा ‘एक मराठा लाख मराठा’ मोर्चे निघाले होते. सर्व आले. काय झालं पुढे ? महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना हीच विनंती आहे, यांच्या भुलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही, घडू शकत नाही त्याची आश्वासने ही लोक देत आहेत असे राज ठाकरे यांनी ठणकावले.