Sandeep Deshpande | मनसे सदस्यनोंदणीत जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी मनसेकडून प्रभातफेरी
मनसेच्या सदस्य नोंदणीबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, लोकांना सदस्य नोंदणी मोहिमेची माहिती व्हावी या दृष्टीने ही प्रभात फेरी काढण्यात आल्याचे संदीप देशपांडे म्हणाले.
मुंबईतील दादरमध्ये मनसेच्या सदस्य नोंदणीला सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत सुरूवात झालेली आहे. तसेच यावेळी त्यांनी माहिम, प्रभादेवी, दादरमध्ये देखिल प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आज लोकांपुढे अनेक समस्या आहेत. रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न आहे, चांगली आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ही लोकांची भावना आहे. तर वेगवेगळे प्रश्न हे सुटले पाहीजेत अशी लोकांचे भावना आहेत. तर मनसेच्या सदस्य नोंदणीबाबत लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, लोकांना सदस्य नोंदणी मोहिमेची माहिती व्हावी या दृष्टीने ही प्रभात फेरी काढण्यात आल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. तसेच या सदस्य नोंदणीला लोकांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याचेही देशपांडे म्हणाले. त्याचबरोबर प्रखर हिंदुत्व हे राज ठाकरे यांची भूमिका आहे. तर हिच भूमिका आमचीही आहे. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. तर राज ठाकरे हे देशातील एकमेव असे नेते आहेत, त्यांनी नुपूर शर्मांच्या त्या वक्तव्याचे समर्थन केलं होतं. त्यांना आपला पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी स्वतःला तथाकथित हिंदुत्व नेते म्हणवून घेणारे शेपटी घालून बसले होते, असा घणांगात देशपांडे यांनी केलेला आहे.