शरद पवार यांच्या सहमतीने अजितदादाचं बंड, पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“शरद पवार यांच्या सहमतीने अजितदादाचं बंड”, पाहा नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

| Updated on: Jul 03, 2023 | 2:34 PM

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे.

मुंबई: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी खळबळजनक विधान केलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस किळसवाण होत चाललं आहे. “अजित पवार यांच्या बंडाशी माझा काही संबंध नाही, असं शरद पवार म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे असेच जाणार नाहीत हे लक्षात घ्या. ते पाठवल्याशिवाय जाऊच शकत नाहीत. उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही. कशाला काही सोयरसुतक राहिलं नाही. हा सर्व ड्रामा आहे. पहाटेच्या शपथविधीने सुरुवात झाली. नंतर राष्ट्रवादी-शिवसेना झाली. आता शत्रू कोण आणि मित्र कोण महाराष्ट्रात राहिलंच नाही,” असं ते म्हणाले.

.

Published on: Jul 03, 2023 02:34 PM