Sanjeev Balyan| ‘आयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’ TV9
तसेच राज ठाकरे यांना आयोध्येला यायचं असेल तर त्यांनी अयोध्यात येण्याच्या आधी आदित्यनाथ यांना भेटायचं, असेही त्यांनी बजावलं आहे.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांनी आपला विरोध दर्शवला आहे. तसेच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही या भूमिकेवर बृजभूषण सिंह हे अजूनही ठाम आहेत. आता बृजभूषण सिंह (MP Brijbhushan Singh)यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढलाल आहे. राज ठाकरेंनी रावणापेक्षा जास्त अत्याचार केला आहे. ते मला आव्हान देत आहेत मात्र माझ्यासमोर ते उंदीर आहेत, असे म्हणत राज ठाकरेंना त्यांना पुन्हा आव्हान दिलंय. याचदरम्यान आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराही पक्का झाल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्यातून सुमारे 15 हजार मनसे सैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहेत. काही उत्तर भारतीय कार्यकर्तेही राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं जात आहे. यादरम्यानच आता आयोध्या दौऱ्याआधी बृजभूषण सिंह यांच्या मागणीला भाजपचा पाठिंबा असल्याचेच बोलले जात आहे. कारण बृजभूषण सिंह यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान (Union Minister Sanjeev Balyan) आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी याचंही समर्थन मिळालंय. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेऊन, चूक केली त्यावर राज ठाकरेंनी स्पष्टता करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान यांनी केलीय. आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, त्याशिवाय अयोध्येत जाऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपचे खासदार बृजभूषण सिंहांनी घेतला.

डोंबिवलीवर शोककळा; संजय लेले यांचं कुटुंब काश्मीरकडे रवाना

नागपूरचे तिलक रूपचंदानी पहलगाममध्ये फसले; हल्ल्यात पत्नी जखमी

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
