मुख्यमंत्री बदलत असतात, अधिकारी कायम असतो, राज ठाकरे यांनी यूपीएससी उतीर्ण विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र

“मुख्यमंत्री बदलत असतात, अधिकारी कायम असतो”, राज ठाकरे यांनी यूपीएससी उतीर्ण विद्यार्थ्यांना दिला कानमंत्र

| Updated on: Jul 23, 2023 | 3:30 PM

राज ठाकरे यांनी आज यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मुंबई, 23 जुलै 2023 | राज ठाकरे यांनी आज यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, “जसं नरेंद्र मोदींना गुजरातबाबत प्रेम आहे, तसं तुम्हाला देखील स्वतःच्या राज्याबाबत प्रेम असू द्यात. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यू कंपनी महाराष्ट्रात आपला प्रकल्प व्हावा यासाठी आली होती त्यावेळी विलासराव देशमुख यांना काही कारणास्तव मीटिंगसाठी उपस्थित राहणे शक्य नव्हतं त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बैठकीसाठी पाठवले. तो अधिकारी साउथ इंडियन होता त्याने सुरुवातीपासूनच कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर ना चा पाडा लावला आणि प्रकल्प महाराष्ट्रात होऊ दिला नाही. कंपनी नाराज झाल्यानंतर त्याने तत्काळ आपल्या राज्यातील आपल्या मित्राला फोन करून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले आणि संबंधित प्रकल्प तामिळनाडू मध्ये गेल्याचे पाहायला मिळालं. अधिकारी म्हणून कुठेही काम करा परंतु आपल्या राज्याबाबत प्रेम असू द्या.”