Raj Thackeray : राज ठाकरेंनी मोदींचे मानले जाहीर आभार

| Updated on: Apr 16, 2021 | 11:56 AM

केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.