Raj Thackeray यांच्या सभेवर CCYV द्वारे पोलिसांची करडी नजर, औरंगाबादचे पोलीस आयुक्त
औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही घटनेचे येथे तात्काळ पडसाद उमटतात. भीमा-कोरेगाव प्रकरणाचे शहरात असेच पडसाद उमटले होते. हे पाहता त्यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दिवशी शहरभर पोलीस तैनात राहणार आहेत.
औरंगाबादः औरंगाबादमधील (Aurangabad) राज ठाकरे यांची सभा घोषणेपासूनच चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत भोंग्यावरून फोडलेले राजकीय फटाके अजूनही राज्यात वाजतायत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यासंबंधी दिलेली डेडलाइन संपण्यापूर्वीच 1 मे रोजी, महाराष्ट्रदिनी त्यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. या सभेसाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून, कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने 2 हजार पोलिस (Police) , 720 एसआरपीएफ तैनात करण्यात येणार आहे. सभेच्या ठिकाणी मैदानात 300 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय 5 डीसीपी, 7 एसीपी आणि शेकडो पीआय, पीएसआय तैनात राहणार आहेत. तसेच मैदानातील प्रवेशद्वारावर 10 ते 15 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. याशिवाय पोलीस मुख्यालयातून सीसीटीव्हीवरून राज यांच्या सभेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.