Special Report | Raj Thackeray अयोध्या दौरा तर ठरलाय, मग आता माघार कोण घेणार?
जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. यावर ना आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली ना राज ठाकरेंची. त्यामुळे जसजसा अयोध्या दौरा जवळ येत आहे, तसे राजकारण अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटले, की राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी एअरपोर्टवरही उतरू देणार नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही, पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे, की जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका. यावर ना आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया आली ना राज ठाकरेंची. त्यामुळे जसजसा अयोध्या दौरा जवळ येत आहे, तसे राजकारण अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.
Published on: May 08, 2022 10:47 PM
Latest Videos