Special Report : राज ठाकरे यांचं पुन्हा भाजपशी बिनसलं? उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी सोडून भाजप नवं टार्गेट? नेमकं कारण काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निशाण्यावर चक्क आता भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत. गेल्या दोनवर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात बोलायला लागले आहेत. कर्नाटक निवडणुकांचे निकाल लागले आणि राज ठाकरे यांचे सुर पुन्हा बदलले.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निशाण्यावर चक्क आता भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत. गेल्या दोनवर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे आता भाजपच्या विरोधात बोलायला लागले आहेत. कर्नाटक निवडणुकांचे निकाल लागले आणि राज ठाकरे यांचे सुर पुन्हा बदलले. कर्नाटक निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपवर ताशेरे ओढले होते. तसेच ही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे हे यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. यानंतर त्र्यंबकेश्वर मंदीर वाद आणि नोटाबंदीवरूनही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सुनावले आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाद रंगला होता. मात्र राज ठाकरे यांचं नेमकं काय बिनसलं? राज ठाकरे यांनी भाजपलं का झोडपलं? याच्या मागचं नेमकं कारण काय? यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…