...तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध

…तर महाराष्ट्राचे वातावरण अजून खराब होणार, राज ठाकरे यांनी केले सावध

| Updated on: Feb 24, 2024 | 1:52 PM

महाराष्ट्राचे राजकारणाचा अक्षरश: चिखल झाला आहे. कोण कोणत्या पक्षातला आहे हेच कळत नाही. राजकारणी टीव्ही चॅनलवर जी शिव्यांची भाषा वापरत आहे. ते पाहाता राजकारणात उतरू पाहणारी भावी पिढी निराश होत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेथे समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षातले आहेत हेच कळत नव्हते असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. लोकांनीच यांना वठणीवर आणले पाहीजे. जोपर्यंत यांना धडा मिळत नाही तोपर्यंत राजकारणी गृहीत धरत राहणार. आज राजकारणात येऊ इच्छीणाऱ्यांना हेच राजकारण आहे असे वाटेल. या तरुण पिढीला आदर्श काय असणार ? नुसतच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे ठीक आहे. परंतू खाली जर हा चिखल होणार असेल तर एका व्यक्तीसाठी हे चांगलं नाही असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. जनतेने योग्यवेळी धडा देऊन यांना सुधरवले नाही तर पुढे हाच चिखल कायम राहून भविष्यात महाराष्ट्राचे वातावरण आणखी खराब होईल असेही राज ठाकरे म्हणाले.

 

Published on: Feb 24, 2024 01:51 PM