राज ठाकरे यांना विचारला गेला वयाचा प्रश्न, मिश्किल उत्तर देत म्हणाले, ए बाबा कॉलजेची लफडी...

राज ठाकरे यांना विचारला गेला वयाचा प्रश्न, मिश्किल उत्तर देत म्हणाले, ए बाबा कॉलजेची लफडी…

| Updated on: Feb 19, 2023 | 2:57 PM

इतिहासात आपण वाचतो इंच इंच लढू. पण, सध्याचे वाक्य आहे इंच इंच विकू. जे दिसेल ते विकायचे आणि त्यातून पैसे काढायचे हे उद्योग सुरु आहेत. सरकारकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढायच्या आणि त्या खाजगी लोकांच्या घशात घालायच्या असे प्रकार सुरु आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माटुंगा येथील VJTI कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कधी गंभीरतेने तर कधी मिश्कीलपणे उत्तरे दिली. आता निवडणूक नाहीत पण एक वाक्य टाकतो, उत्तर तुमच्यासमोरच आहे. इतिहासात आपण वाचतो इंच इंच लढू. पण, सध्याचे वाक्य आहे इंच इंच विकू. जे दिसेल ते विकायचे आणि त्यातून पैसे काढायचे हे उद्योग सुरु आहेत. सरकारकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी काढायच्या आणि त्या खाजगी लोकांच्या घशात घालायच्या असे प्रकार सुरु आहेत, अशी टीका त्यांनी केली. एका विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तरावर राज ठाकरे यांनी का आलात हे विचारू नका असे मिश्कीलपणे म्हणाले. तर, एका विद्यार्थ्यांने आमची इच्छा असूनही आम्हाला मुंबईत रहायला मिळत नाही, त्यावर याचे जाहीर उत्तर काय देणार मला येऊन भेट, असे उत्तर दिले. एका उत्साही विद्यार्थ्यांने तर त्यांना तुमचे वय काय अअसा प्रश्न केला असता, ए ! बाबानो तुमची कॉलेजमधली लफडी इथे काढू नका हा माझ्यासमोर असे हजरजबाबीपणे सांगत प्रश्नाचे उत्तर टाळले.

Published on: Feb 19, 2023 02:57 PM