Raj Thackeray : पुण्यात येत्या 22 मे ला राज ठाकरेची तोफ धडाडणार
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि पर्यायानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. आता राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे.
पुणे- येत्या 22 मे रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) याची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मागील काही यांनी सभांचा धडका लावला आहे. मुंबईतील(Mumbai) दोन सभा आणि औरंगाबादेतील एका सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राज ठाकरे यांचे टार्गेट राहिले. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि पर्यायानं शिवसेनेची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. आता राज ठाकरे यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. मनसेकडून जाहीर करण्यात आले आहे.
Published on: May 19, 2022 06:43 PM
Latest Videos