राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचे संकेत

राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, राज्यातील विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचे संकेत

| Updated on: Sep 18, 2022 | 10:50 PM

राज ठाकरे विदर्भात संघटनेत मोठे फेरबदल करणार आहेत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातही पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केला जाणार आहे. विदर्भातील काही पदांवर नव्या नेमणुका केल्या जाणार आहेत.

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मिशन महाराष्ट्रला विदर्भातून सुरुवात केली. राज ठाकरेंनी सर्व जागा लढण्याचे संकेत दिलेत. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंचं नागपुरात जंगी स्वागत झालं. 2024 च्या निवडणुकीसाठी मनसेनं कंबर कसली. राज्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 विधानसभेच्या जागा लढण्यासाठी रणनीती आखण्यात आली. राज ठाकरेंनी याची सुरुवात विदर्भापासून केली. राज ठाकरे विदर्भात संघटनेत मोठे फेरबदल करणार आहेत. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातही पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केला जाणार आहे. विदर्भातील काही पदांवर नव्या नेमणुका केल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांचा चांगला उत्साह दिसत आहे. त्यामुळं त्यांच्या या दौऱ्याकडं राज्याचं लक्ष लागलंय. ते विदर्भातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.

Published on: Sep 18, 2022 10:15 PM