CM | राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, राज्यात चित्रीकरणाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी
मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे. (Raj Thackeray's phone conversation with Uddhav Thackeray, CM approves filming in the state)
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (२० मे) मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांसोबत झालेल्या चर्चेनंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे. मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी जर कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिला तर त्यांना मंजुरी देता येईल, असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं राज ठाकरेंनी आज जाहीर केलं.
Latest Videos