आज औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा
आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे, आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांनी औरंगाबादमध्ये गर्दी केली आहे.
आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वी मुंबई आणि ठाण्यात दोन सभा घेतल्या आहेत. या दोनही सभेत त्यांनी हिंदुत्त्व आणि मशिदिवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावरून राज्यात जोरदार राजकारण सुरू असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आजच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Latest Videos

लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की नाही? दादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा

वक्फ बोर्ड विधेयकावर जलील यांनी व्यक्त केल्या भावना

मला टोप्या नका घालू, नुसता प्रेमाचा नमस्कार.., दादांचं मिश्कील वक्तव्य

"औरंगजेब इथं गाडलाय...", राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेकडून बॅनरबाजी
