महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट, मनसेची युती होणार?, राज ठाकरे म्हणतात मी पण...

महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट, मनसेची युती होणार?, राज ठाकरे म्हणतात मी पण…

| Updated on: Sep 19, 2022 | 1:28 PM

सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी वेगवेगळ्या विषयांंवर प्रतिक्रिया दिली.

नागपूर : सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी वेगवेगळ्या विषयांंवर प्रतिक्रिया दिली. राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी मनसे, शिंदे गट आणि भाजपात युती होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता मला भाजप, मनसे युतीबाबत माध्यमांमधूनच समजलं, अशी मिष्किल प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणाचा देखील आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सध्या कोण कधी कोणासोबत जातो हे कळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Sep 19, 2022 01:28 PM