विदर्भात राज ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरू...

विदर्भात राज ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरू…

| Updated on: Sep 18, 2022 | 12:50 PM

सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून विदर्भातील अनेक नेत्यांच्या ते गाठीभेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवेंंद्र फडणवीस आणि त्यांच्या गाठीभेटी वाढल्या असल्याने विदर्भ दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत, तसतसे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे प्रत्येक राजकीय पक्ष महानगरपालिका निवडणुकांसाठी झटत असतानाच राज ठाकरे यांनी आपला विदर्भ दौरा काढून या गोष्टीकडे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकाही लोकप्रतिनिधी नाही. नागपूर महानगरपालिकेतही एकही नगरसेवक नाही तरीही राज ठाकरे यांनी हा दौरा काढला असल्याने राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला आहे. आज ते अनेक स्थानिक प्रतिनिधींशी संवाद साधणार असून त्याची तयारीही केली गेली आहे. राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली असल्याने राज ठाकरे यांचा हा दौरा विशेष मानला जातो आहे.

Published on: Sep 18, 2022 12:50 PM