राज ठाकरेंनी गाडीतून खाली उतरून घेतली भेट ,स्वागतासाठी थांबले होते मनसैनिक!
त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार, एखादी मोठी घोषणा करणार का? विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यात सभेसाठी जात असताना घाटकोपर विक्रोळी दरम्यान कार्यकर्ते राज ठाकरेंचं स्वागत करायला थांबले होते.
मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात उत्तर सभा आहे, राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि लगेचच मनसे (MNS) व भाजपाची युती होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं. याच काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार, एखादी मोठी घोषणा करणार का? विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाण्यात सभेसाठी जात असताना घाटकोपर विक्रोळी दरम्यान कार्यकर्ते राज ठाकरेंचं स्वागत करायला थांबले होते. दरम्यान राज ठाकरेंनी गाडीतून खाली उतरून या कार्यकर्त्यांना अभिवादन केलंय.
Published on: Apr 12, 2022 07:13 PM