रिफायनरी संदर्भात ठाकरे गटात फूट? राजन साळवी यांनी स्पष्ट केली भूमिका…
ठाकरे गटाचे नेते राजन सावळी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
मुंबई, 19 जुलै 2023 | ठाकरे गटाचे नेते राजन सावळी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. तर आमदार राजन साळवी यांनी अधिक आक्रमकपणे या प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. त्यानंतर राजन साळवी बॅकफूट आलेले दिसले. मात्र त्यानंतर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. “उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका मांडली आहे आणि मी सुद्धा त्याच भूमिकेवर ठाम आहे. रिफायनरी समर्थक आणि रिफायनरी विरोधक असे दोन गट आहेत. आमचे नेते संजय राऊत आजच्या मुंबई मधल्या रिफायनरी विरोधाच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. मी स्वतः या सगळ्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवणार आणि आता जाऊन आंदोलनाला भेट देणार आहे,” असं राजन साळवी म्हणाले.