पुरातत्व खात्याच्या उदासीनतेचा कळस! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याशी संबंधीत व्यक्तिच्या समाधीची दयनीय अवस्था
1630 ते 1640 या काळामध्ये या समाधीचे बांधकाम झाले असून चार दिवसांपूर्वीच या समाधीचा एक मोठा दगड खाली पडला. विशेष बाब म्हणजे दगड काही बारका सारका नव्हे तर तब्बल दहा क्विंटलचा.
बुलढाणा : या जिल्ह्यातील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालीय. समाधीची अनेक पुरातन दगड पडतना दिसत आहेत. तर काही ठिकाणी दगड उखडून पडले आहेत. जे आता तेथे दिसत देखील नाहीत. 1630 ते 1640 या काळामध्ये या समाधीचे बांधकाम झाले असून चार दिवसांपूर्वीच या समाधीचा एक मोठा दगड खाली पडला. विशेष बाब म्हणजे दगड काही बारका सारका नव्हे तर तब्बल दहा क्विंटलचा. रात्रीच्या वेळी ही घटना झाल्यामुळे जीवितहानी टळली, मात्र दिवसा जर का हा दगड पडला असता तर याठिकाणी मोठी जीवित हानी झाली असती. कारण याठिकाणी दूरवरून पर्यटक येतात. सिंदखेड राजा परिसरात अनेक ठिकाणी पुरातन मंदिर, आणि पुरातन ठिकाण आहेत, त्यांची सुद्धा अवस्था अत्यंत दयनीय झाली. याकडे पुरातत्व विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी खात्याकडे अनेक निवेदन दिले, तक्रारी दिल्या, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. या वास्तूचे जतन, संवर्धन होणे आवश्यक आहे, मात्र अधिकाऱ्यांची उदासीनता याठिकाणी पाहायला मिळत आहे.