रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण- राजेंद्र शिंगणे
मुंबई : राज्य सरकार सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचेच लसीकरण केले जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु केले […]
मुंबई : राज्य सरकार सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे यापूर्वी राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, सध्या लसींचा तुटवडा असल्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचेच लसीकरण केले जाणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु केले जाईल. तसेच मागील काही काळापासून राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. मात्र सध्या रुग्ण कमी होत असल्यामुळे आपली ऑक्सिजनची गरज पूर्ण होत आहे. याविषय़ी अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिगणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
Latest Videos