अजित पवार गटाचा आमदार नाराज?  म्हणाला, एकवेळ घरात बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही

अजित पवार गटाचा आमदार नाराज? म्हणाला, “एकवेळ घरात बसेन पण भाजपमध्ये जाणार नाही”

| Updated on: Jul 14, 2023 | 2:04 PM

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आजरा तालुक्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात आपली भूमिका बोलून दाखवली आहे. राजकारण सोडून एक वेळ घरात बसेन पण भाजपात जाणार नाही.माझी विचारधारा ही शाहू, फुले, आंबेडकर यांचीच आहे

कोल्हापूर: चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आजरा तालुक्यामध्ये झालेल्या कार्यक्रमात आपली भूमिका बोलून दाखवली आहे. राजकारण सोडून एक वेळ घरात बसेन पण भाजपात जाणार नाही.माझी विचारधारा ही शाहू, फुले, आंबेडकर यांचीच आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा पुरोगामी विचार कधीही सोडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंत विकासासाठी निधी दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे असं राजेश पाटील म्हणाले. ते वाटंगी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

Published on: Jul 14, 2023 02:04 PM