Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh Tope | Ayurvedic, Unani, Homoeopathic उपचारांचा Mahatma Phule जीवनदायी योजनेत समावेश करणार

| Updated on: May 03, 2022 | 1:32 AM

सध्या या योजनेचा फायदा एखाद्या नामांकित आयुर्वेदीक हॉस्पिटल होत असून या योजनेत अनेक उपचार यामध्ये घेता येतील 2024 मध्ये नव्याने योजनेच्या आराखडा तयार होईल त्यावेळी आम्ही प्रयत्न करू असं टोपे म्हणाले.

अहमदनगर : कोरोनाची रुग्ण संख्या एवढ्या प्रमाणात वाढत नाहीये की, त्यामुळे चिंता करावी लागेल. पण रुग्णसंख्या वाढली तर नक्कीच राज्यात मास्क सक्ती करावी लागेल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राने जिथे दररोज 63000 रुग्ण पाहिले,  तिथे 900 सक्रिय रुग्ण असणं म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही असं टोपे म्हणाले. मात्र आरोग्य विभाग संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहे असं ते म्हणाले. आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथिक उपचार राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी योजने मध्ये समावेश करणार असल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सध्या या योजनेचा फायदा एखाद्या नामांकित आयुर्वेदीक हॉस्पिटल होत असून या योजनेत अनेक उपचार यामध्ये घेता येतील 2024 मध्ये नव्याने योजनेच्या आराखडा तयार होईल त्यावेळी आम्ही प्रयत्न करू असं टोपे म्हणाले.

Published on: May 03, 2022 12:32 AM