जालना लोकसभेसाठी राजेश टोपे इच्छुक? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

जालना लोकसभेसाठी राजेश टोपे इच्छुक? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 06, 2023 | 7:37 AM

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यातील शिरूर, जालना आणि भिवंडी या तीन मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यातील शिरूर, जालना आणि भिवंडी या तीन मतदारसंघांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित होते. जालना लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय वाघचौरे, चंद्रकांत दानवे या इच्छुक उमेदवारांची चर्चा असताना बैठकीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश टोपे यांचं नाव पुढे केलं. पण टोपे यांनी नकार देत इतरांना उमेदवारी द्यावी अशी भूमिका मांडली. टोपे यांनी काही हौशी कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करत आहेत, पण मी जालन्यातून इच्छुक नाही असे सांगितले.

Published on: Jun 06, 2023 07:37 AM