‘राजपूत, पाटील पदवी आहे तशीच मराठा ही पदवी’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? सदावर्ते म्हणजे…
मराठा हा एका जातीचे नाव नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठा म्हणतात. छत्रपती शिवाजी यांच्या युद्धात औरंगजेबांचे वाक्य पाहिले तर तो म्हणायच्या 'कहा गये मराठे'. 18 पगळ जातीमधले लोक म्हणजे मराठे होते आणि ती पदवी होती. मराठे जसे देशमुख आहेत, राजपूत, पाटील पदवी आहे तशीच मराठा ही पदवी होती.
भंडारा : 14 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षण संदर्भात मराठा समाज आक्रमक झाला. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला शरद पवारांचा हात आहे. अशी टीका सदावर्ते यांनी केली. यावर बच्चू कडू यांनी सदावर्ते हे तज्ञ असून संशोधक आहेत. त्यांनी शरद पवारांचा हात, पाय कोणत्या कॅमेरातून पाहिलं हे त्यांनी दाखवावं असं मिश्किल उत्तर देत सदावर्ते यांना चपराक लगावली. मनोज जरंगे यांनी इतक्या टोकाच्या भूमिकेत जाऊ नये. सरकार मराठ्यांना आरक्षण देणार यात काही शंका नाही. या संदर्भात शासन धोरण सुद्धा झालं आहे. ओबीसीवाल्यांनी जे काही आड आणण्याचा प्रयत्न केला ते चुकीचे आहे. 75 वर्ष सर्व सरकारने अपयश मिळवलं. जे शेतकऱ्यांच्या माथी मारलं आणि ओबीसीमध्ये माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा होतं. महसुली दप्तरी कुणबी आहे आणि मी मराठासुद्धा आहे, असे ते म्हणाले.
Published on: Oct 14, 2023 11:59 PM
Latest Videos