'तुम्ही इकडे या, नाही आले तर...', मनसे आमदाराने कुणाला दिला दम

‘तुम्ही इकडे या, नाही आले तर…’, मनसे आमदाराने कुणाला दिला दम

| Updated on: Aug 01, 2023 | 11:10 AM

आमदार राजू पाटील पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाहण्यास आले होते. हे काम नित्कृष्ट दर्जाचे आढळ्यानंतर राजू पाटील हे महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. 'इकडे या नाहीतर मारेन' अशा शब्दात राजू पाटील यांनी अधिकाऱ्याला दम भरला.

ठाणे : केंद्र सरकारच्या अमृत योजनेच्या माध्यमातून कल्याणमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून कल्याणच्या 27 ग्रामीण भागात पाण्याच्या टाकी उभारणीचे काम सुरू आहे. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आल्या होत्या.त्यानंतर राजू पाटील पाण्याच्या टाकीचं बांधकाम पाहण्यास आले होते. हे काम नित्कृष्ट दर्जाचे आढळ्यानंतर राजू पाटील हे महापालिका अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. ‘इकडे या नाहीतर मारेन’ अशा शब्दात राजू पाटील यांनी अधिकाऱ्याला दम भरला.’सुरू असेललं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं आहे. एवढ्या मोठ्या 9 लाख लिटरच्या टाक्या उभारताना जागेवर माल बनवून काम केले जात आहेत. अशा प्रकारे आमच्या येथे चाळीही बनवल्या जात नसतील. इथल्या सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधीच्या गाड्या घेतल्याच्या बातम्या आम्हाला येतात आणि अशी कामे बघितल्यावर त्यात तथ्य असल्याचं दिसतं. अनेकदा तक्रारी करून यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. मी इथल्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, ठेकेदाराचा गुणवतेबद्दल लेखी तक्रार करा. याचा व्हिजेटीआय कडूज ऑडिट करा’, असे राजू पाटील म्हणाले.

Published on: May 17, 2023 11:06 AM