भाजपच्या हाताखाली भ्रष्टाचार करा, मग शांतपणे झोप लागणार, पाहा काँग्रेस नेता नेमकं काय म्हणाला...

“भाजपच्या हाताखाली भ्रष्टाचार करा, मग शांतपणे झोप लागणार”, पाहा काँग्रेस नेता नेमकं काय म्हणाला…

| Updated on: Aug 07, 2023 | 10:14 AM

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य जागी आल्याचं म्हटलं. त्यानंतर काँग्रेस नेते राजू वाघमारे यांनी टीका केली आहे.

मुंबई, 07 ऑगस्ट, 2023 | भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य जागी आल्याचं म्हटलं. त्यानंतर काँग्रेस नेते राजू वाघमारे यांनी टीका केली आहे. “अमित शाह जे बोलले, ते बरोबर आहे. पंतप्रधान मोदी यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादीवर केला होता. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर तीन तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले. मग ज्यावेळी तुम्ही एका बाजूला सांगता की, त्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देता आणि मग तुम्ही सांगता की ते योग्य जागेवर आलेले आहेत ते बरोबर आहेत. अख्या देशाला कळून चुकलेलं आहे की, ज्यांना कोणाला भ्रष्टाचार करायचा आहे, त्यांनी भाजपबरोबर यावं. भाजप त्यांना पूर्ण अभय देणार आहे. भाजपच्या हाताखाली तुम्ही भ्रष्टाचार करा मग तुम्हाला ईडी वगैरे काही लागणार नाही आणि तुम्हाला शांतपणे झोप लागणार.जयंत पाटील हे कुठेही गेले नव्हते, ते त्यांच्या घरी होते. एखाद्या नेत्याबाबत खोट्या बातम्या पसरवणे संभ्रम निर्माण करणे हा भाजपचा मीडियाला घेऊन एक डाव आहे. काँग्रेस पक्षाला असं वाटत नाही की, महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार आहे.महाविकास आघाडी मजबूत आहे आणि खास म्हणजे जरी हे नेते गेले असले तरी देखील ही जनता काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनासोबत ठामपणे उभी आहे.”

 

 

Published on: Aug 07, 2023 10:14 AM