Special Report | …म्हणून राज्यसभेची निवडणूक बिनविरोधी झाली नाही! -tv9
राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनंही पूर्ण ताकद लावण्यास सुरुवात केलीय. पण निवडणूक बिनविरोध का झाली नाही ?...निवडणूक का लागली ?, त्यामागे हे दोन चेहरे आहेत...एक आहेत, संजय राऊत आणि दुसरे आहेत चंद्रकांत पाटील...
आता वेळ सुरु झाली हे सांगून संजय राऊतांनी भाजपला डिवचलं…राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनंही पूर्ण ताकद लावण्यास सुरुवात केलीय. पण निवडणूक बिनविरोध का झाली नाही ?…निवडणूक का लागली ?, त्यामागे हे दोन चेहरे आहेत…एक आहेत, संजय राऊत आणि दुसरे आहेत चंद्रकांत पाटील…खरं तर संभाजीराजेंनी 6 व्या जागेवर आपल्याला पाठींबा द्यावा, अशी विनंती संभाजीराजेंनी केली. त्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली..ठरल्याप्रमाणं मुख्यमंत्री करतील असं स्पष्टपणे संभाजीराजे म्हणाले होते..म्हणजेच त्या भेटीत उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं हेच सांगण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी केला होता. पण यानंतर, संजय राऊतांनी राज्यसभेच्या 6व्या जागेवर वारंवार दावा करत, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असा आग्रह धरला. एकीकडे संजय राऊत शिवसेनेकडून राज्यसभेच्या 6व्या जागेवर दावा करत होते…त्याचवेळी चंद्रकांत पाटलांनीही भाजप तिसरा उमेदवार देणार असे संकेत 26 मे रोजीच दिले होते…