अजित पवारांनंतर राऊतांकडून ही नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या

अजित पवारांनंतर राऊतांकडून ही नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या

| Updated on: Jan 06, 2023 | 5:56 PM

संजय राऊतांनी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंवरही हल्लाबोल केला. नितेश राणेंचा उल्लेख अजित पवार यांनी टिल्लू असा केला. यावर राऊत म्हणाले, ते नुसते शरीरयष्टीनेच टिल्ले नाहीत, त्यांची बुद्धीच टिल्ली झाली आहे.

मुंबई : राज्यात सध्या वादग्रस्त विधानावरून घमासान पहायला मिळत आहे. त्यानंतर जो तो आपली बाजू माध्यमांनसमोर येत मांडतही आहे. याचदरम्यान विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या असा केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखिल नितेश राणेंचा उल्लेख टिल्ल्या असा केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.

सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलताना नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला होता. तर २६ डिसेंबर रोजी राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात राणे यांच्याविरोधात मानहानीविषयक मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप राणेंनी केला. हा अग्रलेख मी जपून ठेवला असून तो वकिलांनाही पाठवल्याचा इशारा राणे यांनी दिला.

त्यानंतर संजय राऊतांनी नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंवरही हल्लाबोल केला. नितेश राणेंचा उल्लेख अजित पवार यांनी टिल्लू असा केला. यावर राऊत म्हणाले, ते नुसते शरीरयष्टीनेच टिल्ले नाहीत, त्यांची बुद्धीच टिल्ली झाली आहे.

Published on: Jan 06, 2023 05:56 PM