Ram Kadam : चिनगारी का खेल बुरा होता है, राम कदमांचा संजय राऊतांवर निशाणा
संजय राऊतांना साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. यावर शिवसेनेकडून टीखट प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिलाय.
मुंबई : चिनगारी का खेल बुरा होता है, असा निशाणा भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut Ed Inquiry) यांच्यावर साधलाय. यावेळी त्यांनी भगव्याचं विस्मरण झालं नसतं तर ही वेळ आली नसती, असाही टोला लगावलाय. पत्राचाळ पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. यावर शिवसेनेकडून टीखट प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलण्यास नकार दिला आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर भाजपकडून मात्र हल्लाबोल सुरू आहे. सध्या राजकीय वर्तुळात राऊत चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.