“शिंदे कष्टाळू मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरे कष्ट टाळू”, निधी वाटपावरून भाजप आमदाराचा विधानसभेत हल्लाबोल
अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काल अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल चढवला.
मुंबई, 25 जुलै 2023 | अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काल अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या. यावेळी भाजपचे आमदार राम कदम यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, “2019 पासून अडीच वर्षात कष्ट टाळू मुख्यमंत्री पाहिले. तुमच्या सरकारच्या काळात कुणालाही एक रुपयाचा निधी दिला नाही. विरोधकांना एक गोष्ट झोंबलीये. ती म्हणजे वर्तमान कष्टाळू मुख्यमंत्री आणि माजी कष्ट टाळू मुख्यमंत्री. हे वाक्य त्यांना झोंबलंय. इर्शाळाची घटना समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने त्याठिकाणी गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यासाठी 20 तास काम करतात.”
Published on: Jul 25, 2023 08:24 AM
Latest Videos