सभा तर होणारच, अत्यंत जोरदार आणि विराट होणारच : थोरात

सभा तर होणारच, अत्यंत जोरदार आणि विराट होणारच : थोरात

| Updated on: Mar 31, 2023 | 2:00 PM

महाविकास आघाडीची सभा संभाजीनगरमध्ये होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. लोक उत्सुक आहेत. प्रचंड गर्दीही होणार आहे असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला

अहमदनगर : रामनवमी दिवशी आणि त्यानंतर राज्यात काही ठिकाणी दोन गटात राडा झाला. तर पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. दरम्यान उपचार सुरू असताना एका व्यक्तीचा मृत्यू ही झाला त्यानंतर हा राडा जाणून-बुजून करण्यात आला अशी टीका विरोधकांसह सत्तेतील शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांनी केला आहे. त्यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी वादावर प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी राज्य सरकारवर टीका करत गृह खात्यावर निशाणा साधलाय.

महाविकास आघाडीची सभा संभाजीनगरमध्ये होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. लोक उत्सुक आहेत. प्रचंड गर्दीही होणार आहे असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि गृहमंत्र्यांची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Mar 31, 2023 02:00 PM