प्रकाश आंबेडकर यांच्या ‘त्या’ कृतीवर रामदास आठवले नाराज; म्हणाले, “हे दलित समाजाला आवडलं नाही”
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये जावून औरंग्याच्या कबरीसमोर नतमत्सक झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे राज्यातलं राजकारण तापलं. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत हिंदु-मुस्लिम समाजाला सल्ला दिला आहे.
अहमदनगर: काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये जावून औरंग्याच्या कबरीसमोर नतमत्सक झाले होते. त्यांच्या या कृतीमुळे राज्यातलं राजकारण तापलं. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत हिंदु-मुस्लिम समाजाला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “औरंगजेबाचा उदो उदो करण्याची भूमिका योग्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेणे हे दलित समाजाला आवडलं नसून मुस्लिम समाजातील तरुणांनी औरंगजेबाचा उदो उदो करू नये. भारतातले जे मुसलमान आहेत, ते पूर्वी हिंदू होते. हिंदू होण्यापूर्वी ते बौद्ध होते, बौद्ध होण्यापूर्वी ते वैदिक होते. त्यामुळे हे बाहेरून आलेले मुसलमान नाही. यासाठी हिंदूंनी मुसलमानांना समजून घेणे आवश्यक आहे आणि मुसलमानांनी हिंदूंना समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यावेळी सर्वांना सांगणे एकच आहे की, काँग्रेस आणि विरोधीपक्ष हे हिंदू-मुस्लिम समाजात भांडण लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं न ऐकता आमच्यासोबत राहावं असंही त्यांनी यावेळी मुस्लिम समाजाला सांगितले आहे.”

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..

गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ

कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
