छगन भुजबळ यांनी रिपाईत यावे, रामदास आठवले यांची खुली ऑफर

“छगन भुजबळ यांनी रिपाईत यावे”, रामदास आठवले यांची खुली ऑफर

| Updated on: Jun 27, 2023 | 2:11 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, असं वक्तव्य केलं आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी नेत्यांना संधी द्यावी, असं वक्तव्य केलं आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीत फक्त मराठा समाजालाच जास्त पदं दिले जात आहेत ही रास्त भूमिका आहे. कारण छगन भुजबळ हे शरद पवार यांच्यामागे ताकदीने उभे राहिले आहेत. त्यांना जर वाटत असेल की आपल्यावर राष्ट्रवादीत अन्याय होतोय तर त्यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे,” अशी ऑफर रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना दिली आहे.

 

Published on: Jun 27, 2023 02:11 PM