एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी द्या; रामदास आठवलेंची मागणी

एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी द्या; रामदास आठवलेंची मागणी

| Updated on: Aug 24, 2022 | 11:44 PM

मुंबई : नव्या शिंदे-फडवीस सरकारमध्ये मंत्रीपदावरुन अनेक जण नाराज आहेत तर अनेक जण अजूनही मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी देखील मंत्री पदाची मागणी केली आहे. मित्रपक्ष असल्यामुळे आरपीआय मंत्रीपदाची मागणी केली आहे. यापूर्वीसुद्धा रामदास आठवले यांनी मागणी केलेली होती. एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाली पाहिजे अशी मागणी आठवले […]

मुंबई : नव्या शिंदे-फडवीस सरकारमध्ये मंत्रीपदावरुन अनेक जण नाराज आहेत तर अनेक जण अजूनही मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. अशातचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी देखील मंत्री पदाची मागणी केली आहे. मित्रपक्ष असल्यामुळे आरपीआय मंत्रीपदाची मागणी केली आहे. यापूर्वीसुद्धा रामदास आठवले यांनी मागणी केलेली होती. एक मंत्रीपद आणि विधान परिषदेची आमदारकी मिळाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केलीय. तसेच सत्तेमध्ये सहभाग मिळाला पाहिजे अशी मागणी देखील रामदास आठवले यांनी केलेय.  रामदास आठवले यांनी विधीमंडळात फेरफटका मारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांनाच मिळेल असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केला. विरोधक म्हणतात शिंदे-फडणवीस सरकार पाडा म्हणून ते करतात राडा अशी शीघ्र कविता देखील रामदास आठवलेंनी सादर केली.

Published on: Aug 24, 2022 11:44 PM