“प्रकाश आंबेडकर मला ओळखत नाही, पण…”, रामदास आठवले यांनी सांगितला ‘तो’ किस्सा!
दलित पँथर सुवर्ण महोत्सव नागपुरात साजरा करण्यात आला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडर यांच्याबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला.
नागपूर : दलित पँथर सुवर्ण महोत्सव नागपुरात साजरा करण्यात आला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडर यांच्याबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला. “शरद पवार असताना काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेतली, मात्र प्रकाश आंबेडकर मला तिथे जाऊ नका म्हणत होते. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मी टीका करत नाही आम्ही एकमेकांविरोधात बोलत नाही. ते म्हणतात मी आठवले यांना ओळखत नाही मी म्हणतो मी त्यांना ओळखतो. पँथर बरखास्त करण्याची वेळ आमच्यावर आली कारण रिपब्लिकन ऐक्य होत नव्हते. पण आता अनेक विचार एकत्र येत आहेतकी, दलित पँथर पुन्हा सुरू व्हायला पाहिजे , मात्र ती सुरू होऊ शकते का यावर विचार करायला पाहिजे”, असे रामदास आठवले म्हणाले.
Published on: Jun 07, 2023 08:39 AM
Latest Videos