स्वत:साठी जगला तो मेला… वाढदिवसाला शुभेच्छा देताना काय म्हणाले रामदासभाई कदम
संजय राऊत यांचे कोणतेही म्हणणे लोक सिरियस घेत नाहीत.जर लाडकी बहीण योजनेला पैसे कमी पडले तर केंद्रातील आमचे नेते नरेंद्र मोदी सह्याद्रीसाठी धावतील असेही शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांचा आज आज वाढदिवस आहे. तसेच त्यांचे एकेकाळचे पक्षश्रेष्टी आणि आदरणीय नेते उद्धव ठाकरे यांचाही आज वाढदिवस आहे.या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्या रामदास भाई कदम यांनी दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर रामदास भाई कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या जोरदार टिका केली आहे. वाढदिवसाला सर्वजण दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देत असतात. परंतू वाढदिवस म्हणजे आयुष्यातील एक वर्षे कमी होत असते असे रामदास कदम म्हणाले. आयुष्य हे दुसऱ्याच्या कल्याणासाठी खर्च करायचे असते. दुसऱ्यासाठी काम करायचे असते. स्वत:साठी जगला तो मेला असा आजचा मंत्र आहे.उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना रामदास कदम यांनी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा परंतू भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणार नाही. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र मागे जाईल. त्यांना सोन्यासाठी संधी मिळाली होती. परंतू ती त्यांनी घरी बसून वाया घालविली आहे. आमचे सरकार सर्वांना सोबत घेऊन पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत येईल असेही ते म्हणाले.