Ramdas Kadam : रामदास कदम-शिवसैनिकाची ऑडिओ क्लीप व्हायरल, रामदास कदम शिवसैनिकावर भडकले

Ramdas Kadam : रामदास कदम-शिवसैनिकाची ऑडिओ क्लीप व्हायरल, रामदास कदम शिवसैनिकावर भडकले

| Updated on: Jul 24, 2022 | 8:14 PM

एका शिवसैनिकाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होतेय. तुम्ही शिवसेनेत आहात की, शिंदे गटात गेलात, असा सवाल शिवसैनिकानं विचारलाय. यावरती रामदास कदम भडकलेत.

मुंबई : एकनाथ शिंदे गटात गेलेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) आणि एका शिवसैनिकाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होतेय. तुम्ही शिवसेनेत आहात की, शिंदे गटात गेलात, असा सवाल शिवसैनिकानं विचारलाय. यावरती रामदास कदम भडकलेत. असं ऑडिओ क्लीपमध्ये पाहायला मिळतं. टीव्ही 9 मराठी मात्र या ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही.
शिवसैनिक – हॅलो, जय महाराष्ट्र.
रामदास कदम – जय महाराष्ट्र
शिवसैनिक – साहेब, तुम्ही शिवसेनेत आहात की, शिंदे गटात
रामदास कदम – मी आता शिवसेनेत नाही. पण, अद्याप कोणत्याही गटात गेलो नाही.
शिवसैनिक – सर, मी न्यूज बघितली.
रामदास कदम – तू कोण आहेस रे तू.
शिवसैनिक – मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे रामचंद्र गायकवाड.

Published on: Jul 24, 2022 08:14 PM