सौताडा येथील रामेश्वर धबधबा प्रवाहित अन् पर्यटकांना पर्वणी, बघा धबधब्याची विहंगम दृश्य

| Updated on: Sep 25, 2023 | 3:01 PM

VIDEO | राज्यातील जोरदार पावसामुळे गेल्या वर्ष भरापासून हा धबधबा कोरडा ठाक असलेला बीडमधील सौताडा धबधबा पुन्हा प्रवाहित, तीनशे फुटाहूनही जास्त उंच असणाऱ्या धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकांना घालतेय भुरळ

Follow us on

बीड, पाटोदा 25 सप्टेंबर 2023 | गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं राज्यभरात पुन्हा एकदा जोरात एन्ट्री केली आहे. तर विदर्भात या पावसानं चांगलंच झोडपून काढल्याचे पाहायला मिळाले. अशातच मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बीडच्या पाटोदा तालुक्यातील काही मध्यम प्रकल्प भरत आहेत. अशातच सौताडा येथील रामेश्वर धबधबा देखील ओसंडून वाहताना दिसत आहे. गेल्या वर्ष भरापासून हा धबधबा कोरडा ठाक होता, परंतु दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने हा धबधबा यंदा पहिल्यांदाच ओसंडून वाहताना पहावयास मिळतोय, बीड जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख आहे. तीनशे फुटाहूनही जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत आहे. रामेश्वर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली असून या धबधब्याचे मनमोहक आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत.