रामनवमी निमित्त शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाळी

रामनवमी निमित्त शिर्डीत लाखो भाविकांची मांदियाळी

| Updated on: Mar 30, 2023 | 8:17 AM

शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरतीने सुरवात झाली. आजपासून तीन दिवस साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव होणार आहे

अहमदनगर (शिर्डी ) : रामनवमीचा उत्साह देशभरात पहायला मिळत असून भाविक रामनवमी निमित्त दर्शनाला बाहेर पडले आहेत. अनेक नागरिक आपल्या जवळच्या देवसस्थानला भेट देऊन दर्शन घेत आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवालाही लाखो भाविक पहाटेपासूनच भेट देत आहेत.

शिर्डीतील साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरतीने सुरवात झाली. आजपासून तीन दिवस साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव होणार आहे. यावेळी रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभुमीवर साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर लाखो भाविकांची मांदियाळी शिर्डीत पहायला मिळत आहे. राज्यातील प्रमुख शहरातील तसेच गावातूनही शिर्डीला भाविक पायी चालत आले आहेत. पहाटपासून साईभक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याच चित्र येथे पहायला मिळत आहे. आज दुपारी साईमंदिरासमोर श्रीरामजन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. साईनामा सोबत जय श्रीराम असा जयघोष करत भाविक मंगलमय‌ वातावरणात साईदर्शन घेतायत.

Published on: Mar 30, 2023 08:11 AM