“उभा राहाच, तुम्हाला पाडून दाखवतो”, रामराजे निंबाळकर यांचं ‘या’ नेत्याला आव्हान…
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खुलं आव्हान दिलं आहे. तुम्ही फक्त उभे राहाच, तुम्हाला पाडून दाखवतो, असं रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले.
सातारा: विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खुलं आव्हान दिलं आहे. तुम्ही फक्त उभे राहाच, तुम्हाला पाडून दाखवतो, असं रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले. ते फलटण येथील बुथ कमिटीच्या मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले की, “रणजीत नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पक्षातून निवडणुकीत आमच्यासमोर यावे त्यांना मी पाडणारच.तुम्ही फक्त उभे रहा तुम्हाला पाडून दाखवतो वेळ पडल्यास मी स्वतः उभा राहीन किंवा बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर उभे राहतील.”
Published on: Jun 30, 2023 10:05 AM
Latest Videos